मोठी बातमी ! अखेर ठरलं ! गावच्या व शहराच्या कारभाऱ्याची निवड थेट जनतेतून होणार ; एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज बैठक पार पडली.याबैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.यातील पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील पेट्रोल डिझेवर लावण्यात आलेल्या करामध्ये कपात करण्यात आली.दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची तसेच नगरपंचायत नगराध्यक्षाची थेट जनतेमधून निवड होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक घेत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.युती काळात सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यानंतर याच्या निवडणूका होऊन अनेक सरपंच आणि नगराध्यक्ष हे जनतेतून निवडूण आले होते.दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच पुन्हा सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून न करता निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्फत करण्याचा निर्णय घेतला होता.आता एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे.भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. सध्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसला तरी आज दोघांनीही बैठक घेत हे महत्वाचे निर्णय घेतले.हे दोन्ही निर्णय क्रांतीकारी आहे.सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार असल्याने वेगाने निर्णय प्रक्रिया राबविली जाईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

तर देवेंद्र फडणवीस म्हणाले,यापूर्वी या निवडी जतेतूनच केल्या जायच्या. मात्र, महाविकास आघाडीने हे निर्णय बदलले. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यात या निवडी थेट जनतेतून होत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्या मुळे हा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. सरपंच परिषदेने तशी मागणी केली होती. त्यामुळे आता या निवडी केल्या जाणार आहेत.राज्यात काही ग्रामपंचयती आणि नगरपरिषद आणि नगर पालिकांच्या निवडणूका आहे. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे या निवडणूका लांबल्या आहेत. दरम्यान, आता निवडणूकात नगराध्यक्षाच्या निवडी या जनतेतून होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या नंतरचा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. २०२० मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला होता. या निर्णयामुळे शेतक-यांना आता बाजारसमितीच्या निवडणूकांत थेट सहभागी होता येणार आहे. हे सर्व लोक कल्यांणकारी निर्णय असल्योचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *