दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रिअल दूध डेअरी कंपनीत असणारा दूध पुरवठा अचानकपणे खंडित करून तुमच्या दुधात भेसळ आहे असे सांगत,अगोदर दिलेल्या दुधाच्या बिलाची तब्बल ६६ लाख ९३ हजार ५६० रुपये रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत शांताई दूध डेअरीच्या गाडीवर ड्रायव्हर असणाऱ्या ड्रायव्हरला पैशाचे अमिष दाखवत शांताई दूध डेअरीने दिलेले दूध भेसळयुक्त आहे असे सांगून दुसरा कोणताही ड्रायव्हर असेल तर सांग तुला मागेल तेवढा पैसा देतो,असे अमिष दाखवत शांताई दूध डेअरीच्या मालकावर गुन्हा दाखल करणाऱ्या रिअल डेअरीचे मालक संशयित आरोपी मनोज कुंडलिक तुपे, वय.४७ वर्षे,अनिता मनोज तुपे दोघेही ( रा.रो हाऊस नं.५,ग्रीन पार्क, विद्यानगरी,बारामती,जि.पुणे )मनोज शिर्के ( पूर्ण नाव माहीत नाही ),नवनाथ जगताप ( पूर्ण नाव माहीत नाही ) यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भा. द.वि कलम ४२०,५०६,५०७ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हनुमंत जांबले यांचा सन २००७ पासून शांताई दुध डेअरी नावाने दूध संकलन करण्याचा व्यवसाय असून,२०१३ पासून त्यांनी किरण व दुध विंग करण्यास सुरवात केली असून,हे दूध सोनाई,नेचर,शिवप्रसाद,रियल डेअरी अशा विविध डेऱ्यांना संकलित केलेले दुध पाठवतात.२५ फेब्रुवारी २०२२ पासून फिर्यादी हे रियल डेअरी या कंपनीला दूध पाठवण्यास सुरुवात केली असून,त्याचे पैसे सुरवातील दोन दोन दिवसांनी नंतर चार पाच दिवसांनी व पुन्हा दहा दिवसांनी शांताई एंटरप्राइजेसच्या अकाउंटवर पाठविण्यास सुरवात केली. त्यानंतर फिर्यादींनी १ जून २०२२ ते १३ जून दरम्यान तब्बल ३ लाख ६६ हजार ८३६ लिटर असे १ कोटी २६
लाख ९३ हजार ५६० रुपये किंमतीचे दुध त्यांना पाठविले असता,त्याच्या बिलातील ६० लाख संशयित आरोपींनी फिर्यादी जांबले यांच्या शांताई दूध डेअरीच्या खात्यावर पाठविले.
त्यानंतर बाकी राहिलेल्या ६६ लाख ९३ हजार ५६० थकबाकी राहिल्याने व फिर्यादींना शेतकऱ्यांचे पैसे देणे असल्याने त्यांनी संशयित आरोपी रियल डेअरी मालक मनोज तुपे यांना फोन वरून पैशाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी जांबले यांच्या कंपनीत जाऊन पैशाची मागणी केली असता,संशयित आरोपींनी फिर्यादींना अपमानित करत तुम्ही आमच्या केमिस्ट सोबत तडजोड करून दुध पाठवताना भेसळयुक्त दुध पाठवता असे आरोप करून दुध पुरवठा बंद करत,थकित पगार बिल देण्यास टाळाटाळ केली. तसेच फिर्यादींनी तुम्हाला देखील इतर लोकांप्रमाणे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
त्यानंतर २० जून २०२२ रोजी रियल डेअरीचे सिक्युरीटी अधिकारी नवनाथ जगताप यांनी फिर्यादीच्या टॅंकरचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर जाधव याला फोन करून शांताई डेअरीने संकलीत केलेले दुध हे भेसळयुक्त आहे असे सांगण्यासाठी तुला मागेल तेवढे पैसे देतो असे अमिष दाखवत आणखीन कोणता ड्रायव्हर आहे का हे पण सांग त्याला व तुला मागेल तेवढा पैसा व बक्षीस देवून तुमचे नावेही कोणालाही सांगणार नाही असे बोलत फिर्यादी विरुद्ध खोटे बोलण्यास भाग पाडत आहेत. तसेच संशयित आरोपी रियल डेअरीचे मालक मनोज तुपे यांना पुरवठा केलेल्या दुधाचे बिल रखडवल्याने शेतकऱ्यांना बिल देणे शक्य होत नसल्याने फिर्यादींच्या अडचणीत वाढ झाली होती.त्यात तुपे हे इतर दुध पावडर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फोनव्दारे संपर्क करून शांताई डेअरीचे दुध खरेदी करू नका असे सांगत असून, फिर्यादींची बदनामी करत असल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.