गुरुपौर्णिमा विशेष ! आज १३ जुलै गुरु देणं हेच जीवन लेणं..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

गुरुपौर्णिमा मंजे लोखंडरुपी शिष्याचं परीसरुपी गुरु सहवासाने सोनं बनवणं होय.जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचरी गुरु अणू ते रेणूच्या रुपात भेटतो.आपणाला सजीव निर्जीवात माणुसकीचा उन्माळा गुरुमुळे कळतो.

आई प्रथम गुरुमाऊली.बाबा गुरुसावली.गुरुजी जीवनसत्त्वे देणारे.मित्र ,कुटुंब ,स्नेही ,आपतेष्ट हितचिंतक ,नातेवाईक हे वेळोवेळी गुरु भूमिका बजवतात.

अंधाराकडून उजेडाकडे, असत्याकडून सत्याकडे, चुकीच्या मार्गावरुनं योग्य मार्गाने नेणारे सर्वच गुरु असतात.आपणाला जन्मता नजर  येते .पण गुरुमुळे  ज्ञानदृष्टी प्राप्त होती.सबसे बडा गुरु उसे बडा गुरु   का ध्यास.देवाची ओळख गुरुमुळे,ज्ञानाची कवाडी गुरुमुळे,

प्रगतीचा साथीदार गुरु,आत्मीक उन्नती गुरुच्या मुळे असंख्य वाटा व चहुदिशेला नेणारे गुरुच आहेत.गुरु वयापरीस अनुभव व ज्ञानाने मार्गदर्शक असतो.

  सध्य परिस्थितीत आपण चांगल्या गुरुच्या प्रतिक्षेत असाल तर स्वाती नक्षत्राच्या आगमानाने जसं शिपल्यांत मोती तयार होतात. तसं आपले निश्चित होणार.प्रत्येक व्यक्तीतला चांगुलपणा मंजे गुरु, संस्काराचा अविष्कार मंजे गुरु, ठेचगणीस आठवण देणारा गुरु, हासू आसूचा मिलाफ गुरु, सुख दुःखाचा भागीदार गुरु ,घाव घालणारा व सोसणारा गुरु,हाकेला धावणारा गुरु,सावली सारखा संगतीला गुरु असल्यावर आपलं शिष्यत्व बहरणार.

आपणाला गुरु होता आले नाही तरी चांगले शिष्य बनणं हे आपल्या हातात आहे.गुरुविना कुणी दावील वाट अन् लावील वाट.हे सत्यच आहे.आज फुटाफुटावर कान भरणारे,डिवचणारे,अयोग्य दिशेने नेणा-या गुरु पासून सावध. साहित्यकृती,ग्रंथ ,पुस्तके गुरु भावी पिढीला लाभावे.आपल्या सारखे गुरु मला लाभले हे माझं भाग्य .आपल्या प्रत्येकाच्या हातून असंख्य गुरु शिष्य घडावे.

युवापिढीला ज्ञानाची कवाडे खुली करुन देणारी अजरामर व्यक्तीमत्वे गुरु रुपात भेटतात. युवकांनी निसर्गाच्या प्रत्येक घडामोडीतून शिकावे. गुरु शिकवण्याबरोबरच आपणाला घडवत असतात. लोखंडरुपी तुकड्याला शिकवणीरुपी भट्टीत टाकून भात्यारुपी वा-याने निखारा फुलवून , गंजलेल्या तुकड्याला गरम करुन , मायेच्या चिमट्याने घडणीच्या ऐरणीवर ठेवून , घणाच्या घावाने घाव घालणारे गुरु खरंच भेटणे नशीबात असावे लागते. तवा कुठं आकार येतो. गुरुच्या सहवासात आपणांस जीवनाचे तत्वज्ञान समजते. घडणे -बिघडणे , समजणे – उमजणे , नजर – दृष्टी , कळत -नकळत , अवधान – अनावधन यांचीतील सूक्ष्म भेदाभाव गुरुमुळेच कळून येतो.

आपल्या भारतीय संस्कृतीला फार मोठी गुरुपरंपरा आहे. यात ञृषिमुनी , संत , महापुरुष , समाजसुधारक , गुरुजन , माता , पिता , स्नेहीजन यांचा अग्रक्रम असतो. प्रत्येक व्यक्तीचा चांगुलपणा , नम्रता , विद्ववता यातून गुरु पारख होते. जीवनाच्या वाटेवरील स्वार्थी नात्यातील एकच विशुद्ध नातं मंजे गुरु होय.

गुरुसेवा करताना आपल्यातील अहंभाव गळून पडला पाहिजे. आपल्या वर्तनाने गुरुची शिकवण दिसून यावी. पाश्चिमात्य अनुकरण हे सुद्धा वेगळ्या प्रकारचे शिष्यत्व धोकादायक आहे. आपले सण , वार , उत्सव , रुढी , परंपरा , श्रद्धा यांची जपणूक करुन गुरुपूजन करता येते.

युवकांनी माता पिता स्वप्नपूर्ती , महापुरुष वैचारिक आचरण , वैज्ञानिक , संशोधक यांची शोधक वृत्ती , बळीराजा व जवानांची निष्ठा संभाळणे हीच गुरुसेवा होय.

अध्ययन , अध्यापन , संशोधन , होतकरु वृत्ती , नाविन्याचा ध्यास , जुन्यातून नाविन्याकडे वाटचाल , पुरोगामी विचार याची शिकवण सुद्धा गुरुने द्यावी . गुरुकृपा आपल्या कर्तृत्वाने लाभते. गुरुच्या नजरेत राहण्यासाठी शिष्यांने नटण्यापरीस कार्य करीत राहिल्यास परिपूर्णता लाभते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सदैव सद्गुरु पाहावे. जीवाने जीव जाणणे , सुखदुःखात सदैव सामील होणे , समाजकार्यात अग्रेसर ही चांगल्या गुरुबरोबर उत्तम शिष्याची लक्षणे असतात.

आपलाच शिष्य प्रा.रवींद्र कोकरे 🙏💐😊 गुरुचं देणं जीवन लेणं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *