जेजुरी प्रतिनिधी दि :
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांची सेवा कार्यकालानुसार पदोन्नती जाहीर करण्यात
आलेली असताना जेजुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्यांची त्यांच्या सेवा कार्यकालानुसार नुकतीच पोलीस खात्यातील पुढील पदावर पदोन्नती करण्यात आली.असून यामध्ये ३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश
आहे.जेजुरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारे कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी नुकतेच प्रमोशन दिलेले आहे.सुरूवातीला एक महिन्यापूर्वी एकूण १२ लोकांना प्रमोशन देण्यात आले तसेच परवा आणखी ६ लोकांना प्रमोशन देण्यात आले. पोलीस नाईक पासून वरती सर्व अधिकारी यांना तपासाचे अधिकार असतात.तपासी अंमलदार यांची पुणे ग्रामीण मध्ये कमतरता होती परंतु माननीय पोलीस अधीक्षक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोशन काढल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात आनंद व्यक्त होत आहे.
जेजुरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या खालील
महादेव कुतवळ,अरविंद बाबर,शिरीष लोंढे,मंदा यादव, विठ्ठल कदम,सोमनाथ चितारे,संतोष मदने,रेणुका पवार निता दोरके,धर्मवीर खांडे,हरीशचंद्र करे,गणेश नांदे, शशिकांत लोंढे,दीपक आवळे,देवेंद्र खाडे,विजय ओंबासे,अतुल मोरे,विनोद माने अशा एकूण १८ कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्यात आली.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे परेड वर अभिनंदन केले व कौशल्यपूर्ण तपास करण्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले.पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत राहून
अनेक गुन्ह्याची उकल केलेली असून त्यांची नुकतीच सेवा कार्यकालानुसार पदोन्नती झाली आहे. त्यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे पुणे जिल्ह्यातून त्यांचे स्वागत होत आहे,तर जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक सोनवलकर यांच्या हस्ते पदोन्नती झालेल्या
सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.