Daund Crime : सुपा – चौफुला रोडला गाडी चालकाला अडवून तुझ्या गाडीत गांजा व अफीम आहे अशी भीती दाखवत २५ हजारांची मागणी करणाऱ्या ‘बोगस’ पोलीसांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले..!!


चौघां तोतया पोलिसांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा फसवणूकीचा गुन्हा दाखल….

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सुपा – चौफुला या रस्त्यावर देऊळगाव गाडा हद्दीत मालवाहतूक गाडीला अडवून तुझ्या गाडीत गांजा व अफीम आहे,आणि आम्ही पोलीस आहोत आम्हाला गाडी चेक करायची असून,गाडीत काही न सापडल्याने २५ हजारांची मागणी करत व दमदाटी करणाऱ्या चौघा बोगस पोलिसांवर यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १७०,३४१,४२०,३८९ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चौघांपैकी एका बोगस पोलीसाला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले असून, याप्रकरणी संशयित आरोपी हुसेन जानाशा ईराणी (रा.शिवाजीनगर, पुणे ) या तोतया पोलीसाला पाटस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.व इतर तिघेजण फरारी आहेत.याबाबत वाहनचालक गणेश लाल लाधुलाल नायक, वय.३५ वर्षे (रा.रघुनाथपूर ता.तोडारायसिंग,जि.टॉक,राज्य राजस्थान) यानी फिर्याद दिली आहे.

याबाबत यवत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहनचालक गणेशलाल नायक हा ट्रक क्र. (RJ.09.GD.3583) या मालवाहतूक गाडीमधून चिखली येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यातुन ट्रकमध्ये साखर भरून राजस्थानकडे निरा ते शिरूर रोडने शिरूर बाजूकडून मोरगाव- सुपा – चौफुला मार्गावरून जात असताना, सकाळी ९.३० च्या सुमारास सुपा घाट क्रस करून देऊळगाव गाडा गावच्या हद्दीतून जात असताना,पाठीमागुन सुपा बाजुकडुन दोघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी ट्रकला गाडी आडवी मारून ट्रकला थाबवलं असता,आम्ही पोलिस आहोत सकाळी मध्ये आम्हाला तुमची गाडी चेक करायची आहे,असे म्हणत त्यापैकी काळ्या रंगाचा रेनकोट घातलेल्या एकाने ट्रकची पाहणी केली असता,ट्रकमध्ये काहीएक मिळाले नाही.त्यानंतर आम्ही पोलीस आहोत २५ हजार द्या अन्यथा,पोलीस ठाण्यात घेऊन जात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

त्यावेळी रोडने जाणाऱ्या ग्रामस्थांना त्यांचा संशय आला असता,काय झाले असे विचारल्याने ट्रक अडविलेल्या एका संशयित आरोपीमधील एकज म्हणाला की,आम्ही पोलीस आहोत आणी गाडी चेक करीत आहोत.असे सांगितले असता त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना ओळखपत्र मागीतले असता ते तेथुन पळ काढला.त्यामुळे ग्रामस्थांनी व चालकाने त्याचा पाठलाग केला असता, चौघांपैकी एक जणाला ग्रामस्थांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. ट्रकला आडवी लावलेल्या गाडीची पाहणी केली असता, गाडी क्र.MH.12.QD. 9779 असा आढळून आला.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एस.व्ही.चव्हाण हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *