Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक; ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!!


डोंबिवली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

तीन जणांना अटक करून एकूण ४० लाख रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे.याबाबत वृत्त असे आहे कि, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे अमित झोपे हे त्यांच्या परिवारासह पुणे येथे कार्यक्रमासाठी गेले असता, त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरटयांनी तोडून त्यांच्या घरातील १०० तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करून नेले असल्याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिजित रॉय यास कामाठीपुरा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण ७१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २५७.८९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा चोरीस गेलेला माल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडून इतर ठिकाणी केलेल्या घरफोडी चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आला.इम्रान खान आणि रियाज खान या दोघांना देखील पोलिसांनी घरफोडीच्या गुन्हयात अटक केली आहे.

त्यांच्याकडून पोलिसांनी १ मोटार सायकल, २ मोबाईल, कॉपर पॉलिकॅब वायर, पितळी वॉल आणि गाडीचे सायलन्सर असा मुद्देमाल हस्तगत केला.पोलिसांनी या तिघांकडून मानपाडा व टिळकनगर पोलीस ठाण्यातील एकूण १० गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *