Palakhi Sohla News : आज ३ जुलै माऊली वैष्णव बरडग्रामी..!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते. अश्या बरडग्रामी माऊली वैष्णव विसावतात.

फलटण नगरीचा दोन दिवसाचा शाही मुक्काम आटोपून श्रीराम कारखाना रम्य प्रहारी पाहुणचार घेऊन पंढरी समीप आल्याने वारकरी उत्साहात पाऊले चालती. रोपवाटिका , हिरवीगार शेती , फाट्याचे जल याने वेढलेल्या विडणीत सकाळाचा विसावा मंजे भाविक भक्तांची पर्वणीच असते. अस्सल गावरान भाजी भाकरं , ठेचा युक्त सात्त्विक आहाराच्या पगंती दिसतात. हरिगजर , नामस्मरण वातावरण दुमदूमन जाते.

दुपाराचे भोजन पिंपरद व विसावा निंबळक येथे घेऊन वाटचाल सुरु राहते. नैसर्गिक परिस्थितीत अनुकूल नसतानाही प्रतिकूल अवस्थेत आनंदी वृत्तीने व ओरड न करता लढणा-या बरडग्रामवासियांचे माऊली कौतुकच करते. वारक-यांची लक्षणिय वाढ तरीही सेवेत अग्रेसर बरडकरांना जय हरि माऊली.

सातारा जिल्ह्यातील अंतिम मुक्काम उरकून माऊली सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार याचा आनंद .

आपलाच वारीचा सेवक प्रा. रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *