Baramati News : बारामतीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासकीय भवनाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यासाठी व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन..!!


अवैध धंदे येत्या सात दिवसांत बंद नाही झाले,तर प्रशासकीय कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा निकाळजेंचा ईशारा…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवीन प्रशासकीय भवनचे मुख्यप्रवेश द्वार उघडण्यासाठी तसेच बारामती शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी मंगलदास निकाळजे पुणे जिल्हा महासचिव यांच्या नेवृत्वाखाली आगळे वेगळे प्रकारचे ठिय्या आंदोलन करण्यात आले असून,याआधी देखील नवीन प्रशासकीय भवनचे मुख्य प्रवेश द्वार उघडण्यासाठी जनआक्रोश आंदोलन करणात आले होते.परंतु प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्या मुळे हे आंदोलन करत असल्याचे मंगलदास निकाळजे यांनी सांगितले.

बारामती मतदार संघाचे आमदार अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाला वारंवार अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या असताना देखील,पोलीस प्रशासनाकडून तत्पुरत्या स्वरूपात कार्यवाही केली जाते आणि पुन्हा जैसे थे अशाप्रमाणे अवघ्या दोन ते तीन दिवसांत अवैध धंदे जोरात सुरू केले जातात.या अवैध धंदेवाल्यांचे पोलीस अधिकाऱ्यांशी व महसूल प्रशासनातील साटेलोटे असून चिरीमिरी घेऊन त्याला पाठबळ देण्याचे काम पोलीस व महसूल प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी केला आहे.बारामती तालुक्यामध्ये हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे.यामुळे कित्येकांचे संसार उघड्यावर पडले असून,कित्येकजण मुत्युमुखी पडले आहेत.

तसेच मटका हा व्यवसाय पारंपारीक व्यवसायाप्रमाणे झाला आहे हा व्यवसाय कधीही बंद न होणारा व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांवर किरकोळ कारवाई केली जाते. मटका व्यवसायामुळे कित्येक लोकांना राजरोसपणे लुटले जात आहे.महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीवर पुर्णपणे बंदी घालुन गुटखा विक्री कायमची बंद केली आहे.पंरंतु बारामती शहरांत मोठया प्रमाणात गुटखा विक्री केली जाते.बारामती शहरातील टपऱ्यांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो.यावर शहर पोलीस प्रशासन छोटया छोटया टपऱ्यांवर कारवाई केल्याचे दाखवून देतात,आणि जे मोठे डिलर त्यांना मोकळे सोडतात. त्यामुळे आता अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे निकाळजे यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

त्यामुळे अवैध दारू,मटका, जुगार, गुटखा,खासगी सावकारी व्यवसाय व इतर अवैध धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत.आणि अशा लोकांवर तडीपारी,एन.पी.डी, मोक्या अंतर्गत कार्यवाही करून बारामती शहर अवैध धंदेमुक्त करावे.बारामती शहरातील हे अवैध्द धंदे येत्या सात दिवसांत बंद नाही झाले,तर प्रशासकीय कार्यालयासमोर सामोहिक आत्मदहन करण्याचा ईशारा निकाळजे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.यावेळी बारामती शहराध्यक्ष जितेंद्र कवडे, तालुका सचिव कृष्णा साळुंके,गणेश गायकवाड, अक्षय गायकवाड,अभिजित कांबळे, प्रतीक चव्हाण,कृष्णा क्षीरसागर, अमोल धेंडे,अर्जुन धडस,शिल्पा यशवडे,उषा भोसले,सीमा कांबळे शिला जगताप,ज्योती पोळके, प्रिया गायकवाड,शोभा आल्हाट, अंजना बगाडे,कावीरा लोंढे, विमल रणधीर,आकाश लांडगे,सिद्धार्थ पवार,करण भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी चौकट :

मी अवैध धंदे बंद करण्याबाबत तक्रार केली असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना माझे नाव अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने माझ्यावर दबाब आणला जात आहे.त्यामुळे माझ्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे मला पोलीस संरक्षण देण्यात यावे.

मंगलदास निकाळजे ( वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा सचिव )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *