मोठी बातमी ! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई;लक्झरी बसमधून विदेशी दारुचा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

गोव्यातुन लक्झरी बसमधून बेकायदेशीरपणे विदेशी दारु व बिअरची तस्करी करुन पुण्यात आणलेला माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला आहे. याप्रकरणी लक्झरी बस,तीन चाकी रिक्षासह ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे याप्रकरणी मंगेश पोपट मोरे,अक्षय बाळासाहेब हुलगे, पंकज देवनारायण निसाद व रवींद्र अशोक घारगे अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,गोव्यातून एका लक्झरी बसमधून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिरासमोर एका लक्झरी बसमधून विदेशी मद्य व बिअरचा साठा उतरवून तो तीनचाकी रिक्षामध्ये भरला जात होता.राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही बस व रिक्षा जप्त केली आहे.ज्या ठिकाणी ही साठा ठेवण्यात येणार होता त्या कात्रज येथील अंजनीनगर येथील रवींद्र घारगे यांच्या घरावर छापा टाकला. तेथे ३ लाख ९३ हजार ७२० रुपयांचा माल आढळून आला.त्यामध्ये विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण ४५ बॉक्स तसेच लक्झरी बस व तीन चाकी रिक्षा असा एकूण ८० लाख ८ हजार ६० रुपयांचा माल जप्त केला आहे.याप्रकरणी चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक आर.पी.शेवाळे, एस.एल पाटील,टी.बी.शिंदे,दुय्यम निरीक्षक चंद्रकांत रासकर,राजेंद्र झोळ,संजय राणे,प्रशांत दळवी, राम सुपेकर,अमित वालेकर, योगेंद्र लोळे,संकेत वामन, कर्मचारी राजेश पाटील,शरद भोर,समीर पडवळ,राजू पोटे, महेश बनसोडे,रणजित चव्हाण, दत्ता पिलावरे, नवनाथ पडवळ, वासुदेव परते,उज्वला भाबड यांच्या पथकाने केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *