Anti Corruption Bureau : वीस हजारांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..!!


कोल्हापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी वीस हजारांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षकाला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने रंगेहात पकडले.अमित भागवत पांडे,वय.३४ वर्षे (रा. पाटणेफाटा,मूळ रा.खोतेवाडी,ता.हातकणंगले) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शनिवारी दुपारी पाटणे फाटा येथे केली.अमित पांडे हे चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत पाटणे फाटा पोलीस चौकीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

गेल्या दोन महिन्यापूर्वीच ते पोलीस ठाण्यात हजर झाले होते.तक्रारदार व वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करावी म्हणून पांडे याने तक्रारदाराकडे ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता अमित पांडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आज सापळा रचण्यात आला.ठरलेल्या ४० हजार रुपया पैकी २० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना पांडे यांना पाटणे फाटा येथे रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव,पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार सुनील घोसाळकर, पोलीस कर्मचारी नवनाथ कदम,संदीप पडवळ,मयूर देसाई,सूरज अपराध यांच्या पथकाने केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *