बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी याठिकाणच्या झाडाच्या फांद्या विनापरवाना तोडल्याने दोघांवर शहर पोलिस ठाण्यात चोरीचा व महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे सरंक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पांडुरंग माने पूर्ण नाव माहीत नाही (रा.बारामती ),दिलीप बाबुराव जगदाळे (रा.बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष जगन्नाथ वाबळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्याद हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती येथील खासगी निवासस्थानी ड्युटी बजावत असताना,दि.१० जून रोजी सकाळी बंगल्याची पाहणी करत असताना,बंगल्याच्या परिसरातील कंपाउंड वॉलच्या आत लावलेली फायकस झाडाच्या फांद्या कंपाउंड बाहेरुन कु-हाड कोयत्याने तोडत असल्याचे
निर्दशनास आल्याने,फिर्यादींनी फांद्या तोडणा-याला याबाबत विचारणा केली असता त्याने दिलीप जगदाळे यांच्या सांगण्यावरून झाडे तोडत असल्याचे सांगितले.
यातील संशयित आरोपींनी झाडाच्या अंदाजे २० ते २५ झाडांच्या फांद्या तोडलेल्या निदर्शनास आल्या.व त्यातील काही फांद्या घेवुन जात असताना,फिर्यादींनी पहिले असता,फिर्यादींनी तुम्ही कोणाला विचारून हे करत आहात,याची काही परवानगी घेतली आहे का ? असे विचारले असता त्यांनी कोणाची परवानगी नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी झाडाच्या फांद्या तोडण्याचे
थांबवण्यास सांगितले.याबाबत फिर्यादींनी विनापरवाना झाडाच्या फांद्या तोडत,त्या घेऊन जात असताना निदर्शनास आले असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जगताप हे करीत आहेत.