बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलिसांनी डोर्लेवाडीतील ३० फाट्यावर
गांजा विकणाऱ्याला ताब्यात घेतले असून,त्याच्याकडून ७८ हजारांचा गांजा जप्त केला आहे. याबाबत संशयित आरोपी अमित कुमार अनिल धेंडे,वय.४० वर्षे (रा. सिद्धार्थनगर,ता.बारामती, जि.पुणे) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० (b),२० (b) (ii),८ (c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शहर पोलीस कर्मचारी तुषार दत्तात्रय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार,डोर्लेवाडी येथील ३० फाट्यावर गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी गेले असता,त्याठिकाणी संशयित आरोपी चोरट्या पद्धतीने गांजा विक्री करत असल्याचे दिसून आले.त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता,त्याने तो गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. गांजाबाबत माहिती असता,त्याने हा गांजा ९६९९९३३७८४ या नंबरवर फोन केल्यानंतर ही व्यक्ती गांजा आणुन देत असल्याचे सांगीतले.यामुळे या गांजा विक्रेत्याला गांजा पुरविणाऱ्या या ९६९९९३३७८४ क्रमांक असणाऱ्याला शहर पोलीस लवकरात लवकर ताब्यात घेणार का ? असा प्रश्न आता बारामतीकरांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ हे करीत आहेत.संशयित आरोपीला कोर्टात हजर केले असता,मा.न्यायालयाने संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी यांनी सुनावली आहे. सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी न्यायालयात पोलिसांची बाजू मांडली.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ,पोलीस हवालदार कांबळे,पोलीस कर्मचारी बंडू कोठे,पवार,इंगोले यांच्या पथकाने केलेली आहे.