बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती शहरातील आमराई विभागातील सर्वोदय नगर येथील एका सदनिकेत गेल्या महिन्यात अवैधरित्या आयडिया कंपनीचा टॉवर उभारण्यात आला होता. सदर टॉवर हा रहिदारीच्या ठिकाणी उभारला असून भविष्यात आरोग्याचा प्रश्न आणि एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते, या विचाराने सर्वोदय नगर आणि चंद्रमणीनगर मधील स्थानिकांनी या टॉवरला मोठा विरोध दर्शविला होता. या टॉवर विरोधात महावितरण आणि बारामती नगर परिषदेला स्थानिक एकत्र येत सहीनशी निवेदन दिले होते.
तसेच या अवैधरित्या उभारलेल्या टॉवरच्या विरोधात भारतीय नायकमध्येही बातमी देण्यात आल्या होत्या. या निवेदन आणि बातमीची दखल स्थानिक प्रशासनाने घेत सदर आयडियाचा टॉवर हाटविण्याचे काम आज, मंगळवारी ( ७ जून) रोजी करण्यात आले.दरम्यान,सदर अवैधरित्या उभारलेल्या टॉवर विरोधात एसपी पोलीस कार्यालयात पहिली तक्रार ही सर्वोदय नगरमधील स्थानिक रहिवासी विशाल जाधव यांनी दिली.
यानंतर आरपीआय (आ) चे बारामती शहराध्यक्ष तथा पत्रकार अभिजीत कांबळे, पत्रकार विराज शिंदे, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका आरती गव्हाळे, स्थानिक पायल चव्हाण, साक्षी गायकवाड,उर्मिला गायकवाड, गणेश जाधव,पूजा मोरे, संजना मोरे, सीमा मोरे, निर्मला शिंदे, वर्षा वाघमारे यासह सर्वोदयनगर आणि चंद्रमणी नगरमधील स्थानिकांनी सदर टॉवरचा प्रश्न उचलून धरला.