Crime News : ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; अवैध गुटखा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल,दीड लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत..!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाइव्ह न्यूज नेटवर्क..

फलटण तालुक्यातील राजेगाव येथे किराणा दुकानात अवैधरित्या गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी त्याच्याकडून २२ हजारांचा विविध गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३२८,१८८,२७२,२७३,अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२) (i) (iv),२७(३) (e),३० (२) (a),५९ अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली २०११ चे कलम ३,१,७,२,३,४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीला अटक करण्यात आली आहे.केशव विठोबा गायकवाड ( रा. वाजेगाव,ता. फलटण,जि.सातारा ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,फलटण मधील बाजेगावात एकजण स्वतःच्या सुरज किराणा जनरल स्टोअर्स मध्ये गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली असता,त्याठिकाणी छापा टाकत, दुकानाच्या बाहेर असलेल्या जिन्याखाली २२ हजारांचा विविध प्रकारचा गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला ताब्यात घेतले.

संशयित आरोपीला मा.कोर्टात हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीला पोलीस कस्टडी सुनावली आहे.याबाबत अधिक तपास केला असता आरोपीने हा गुटखा हा संतोष दोशी यांच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने,जोशी यांच्या दुकानशेजारी असणाऱ्या गोडाऊन तब्बल सव्वा लाखांचा विविध प्रकारच्या गुटख्याचा मुद्देमाल मिळून आल्याने मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक केली आहे.या संशयित आरोपीला देखील पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

ही कामगिरी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस कर्मचारी उर्मिला पेंदाम,दादासो यादव,अभिजीत काशिद,राजेंद्र गायकवाड,अमोल जगदाळे व गणेश अवघडे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *