महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म झालेल्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करा,अशी मागणी भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे हे आवाहन करताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे.तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही, हे दाखवून द्या,असा घणाघाती आरोप पडळकरांनी राज्य सरकारवर केला आहे.या सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीने राष्ट्रवादीकडून भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना फोनवरून संपर्क केला असता,नाव बदलण्यापेक्षा कुठल्याही शहराचे नाव बदलून त्याचे प्रश्न सुटू शकत नाही.
त्याच्यामुळे आहिल्यामाई ज्या चौंडीत जन्मल्या आहेत. त्या राष्ट्रीय आणि जगाचं दैवत आहेत. त्याच्यामुळे औरंगाबाद असुद्यात किंवा अहमदनगर असुद्यात यांचे नाव बदलून त्या ठिकाणचे प्रश्न कुठे सुटतात का ? असा सवाल देखील मिटकरींनी उपस्थित केला.शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आहेत.डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत.गॅसचे दर वाढलेले आहेत.याबद्दल हिम्मत करून प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावं. उगाच काहीतरी विषयांतर करायचं आणि देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी असे पत्र लिहायचे.तसेच पडळकरांवर निशाणा साधताना,मिटकरी म्हणाले की,माणसाचं लग्न योग्य वयात झालं नाही तर माणसाचं डोकं काम करत नसतं, त्याच हे प्रतीक आहे.त्याच्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीने मूर्खपणा करून महाराष्ट्राच्या महत्त्वांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केंद्र सरकारच्या पद्धतीने करत आहे,त्याच्यावर काही न बोलता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही न बोलता हे काही भलतचं काहीतरी काढायचं..
प्रक्षोभक वक्तव्य करायचं,भाषणं द्यायची..असा प्रयत्न पडळकरांचा चालू आहे.अहिल्याबाई होळकरांचा वारस प्रत्येकामध्ये आहे.प्रत्येक जातीमध्ये त्यांचा वारस आहे. ह्या एकट्या पठ्ठ्याने काय ठेका घेतला आहे का ? त्याच्यामुळे ही अशी बावळट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या पत्राला काय कवडीची किंमत नाही.असे विषय काढून विषयांतर करायचे असा उद्योग असे करतात. यावर एबीपी माझा माझाच्या वृत्तनिवेदीका ज्ञानदा कदम यांनी मिटकरी यांना जर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींला प्रतिसाद दिला नाही तर,बहुजन समाज जागा झाला आहे.संघटित झाला आहे,हे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने लक्षात ठेवाव या या इशाऱ्यावर काय म्हणांल असा प्रश्न विचारला असता,बहुजन समाज सुरुवाती पासून जागृत झाला आहे.
याच्या सांगण्याने बहुजन समाज जागृत झाला आहे असं होतं नाही.बहुजन समाजातील सर्व तरुण मुले जागृत आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते अत्यंत प्रगल्भ आहेत. कुठल्या पत्राला किती प्राधान्य द्यावं, हे मुख्यमंत्र्यांना माहित आहे.त्याच्यामुळे हे पत्र डस्टबिनमध्ये टाकण्याच्या लायक आहे.असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केल आहे. यामुळे आता मोठ्या वादाला ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे आता या वक्तव्यावर महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक होणार याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.आणि भाजप राष्ट्रवादी संघर्ष देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.