पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
गेल्या काही वर्षांत महिलांवरील आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आलेत.त्यानुसार,सोळा किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्याची कायदा दुरुस्ती करण्यात आली आहे.या दुरुस्तीचा आधार घेत पुणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी एका आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजारांचा दंड न भरल्यास एक वर्षे साधी कैद सुनावली.
प्रदीप धर्मा देवकुळे (रा.काळे, पडळ,हडपसर,पुणे )असे या आरोपीचे नाव आहे.ही घटना २३ ऑगस्ट २०१५ रोजी समोर आली.या प्रकरणातील सतरा वर्षीय पीडित मुलगी आहे.आरोपी हा पीडित मुलीच्या आत्याचा मुलगा आहे.पीडित मुलगी ही तिच्या मावशीच्या घरी जात असताना,आरोपीने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर घेऊन जात असताना,तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत,तिच्याशी जबरदस्तीने संभोग केला आणि तिला मावशीच्या घरी पोहोचवले.या प्रकाराने पीडित युवती घाबरल्याने तिने हा प्रकार कोणालाच संगितला नाही.तिची मासिक पाळी ४ महिने थांबल्याने तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये चेक केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी पीडितेच्या घरच्यांनी भा.द.वि कलम ३७६ चा गुन्हा दाखल केला.त्यानंतर पोक्सो कायद्यान्वये कलम ४,६ शुल्क जोडण्यात आले.व आरोपीला अटक करत तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (एफ) (आय) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ नुसार आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांनी या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याने गुन्ह्यातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे.या गुन्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी काळे राईटर संदीप राऊत,लवटे, वानवडी पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार बी.एस.लोखंडे,कोर्ट कारकून पोलीस हवालदार ए.एस गायकवाड यांनी उत्कृष्ठ तपास केल्याने कोर्ट कर्मचारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बातमी कोट :
या अगोदरही सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी काळे यांनी उत्कृष्ट तपास केल्याने गुन्ह्यातील आरोपींना १३ वर्षे सश्रम कारावास व १.५ लाख रुपये दंड अशी शिक्षा शिक्षा सुनावल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी राणी काळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना प्रशंसा प्रदान केले आहे.