Gopichand Padalkar Speak : चौंडी येथील जयंतीत राजकारण आणले तर मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही;बारामतीमधून गोपीचंद पडळकरांचा पवारांना ईशारा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

“जागर अहिल्यादेवी युगाचा, जागर पराक्रमी इतिहासाचा” भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या यात्रेची सुरुवात सुभेदार मल्हाराव होळकर यांचे होळ मुरूम यांच्या जन्म गावातून केली,यानंतर ते बी.के. कोकरे यांच्या उंडवडी गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले,यावेळी पडळकर बोलताना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होत जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीहो इतिहास घडवू शकत नाही,आणि त्यासाठीच मी यात्रा सुरु केली असुन,काही लोक त्याच इतिहासावर आता आक्रमण करीत आहेत.

देशातील काना कोपऱ्यातील जी मंदिरे मुघलांनी पडली, ती सर्व मंदिरे पुन्हा बांधण्याचे काम अहिल्यादेवींनी केले असे देखील पडळकरांनी आवर्जून सांगितले.यावेळी पडलकर म्हणाले की, बारामतीकरांच्या सतरंज्या उचलतोय त्यामुळे आपण मागे आहोत.बी.के.कोकरे यांनी इंजिनिअर असताना सुद्धा नोकरी सोडून समाजाचे कार्य केले.याची जाणीव सुद्धा लोकांनी ठेवली पाहिजे. बी.के.कोकरे यांनी चळवळ चालू केली त्यामुळेच आता धनगरांची पोरे बोलू लागली आहेत.ज्या लोकांनी बी.के यांना त्रास दिला. त्या प्रस्थापितांना पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही.ज्याप्रमाणे फुले शाहू, आंबेडकर जसे वंदनीय आहेत तसेच बी.के.कोकरे हे देखील आम्हाला वंदनीय असून,त्यांनी चालू केलेली चळवळ आता मी पुढे घेऊन जाणार आहे त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचा शब्द पडलकरांनी उंडवडी गावातील गावकऱ्यांना दिला.

तसेच मिळालेली आमदारकी ही त्यांच्या पायाशी अर्पण करत,बी.के.कोकरे यांच्या स्मारकासाठी आपल्या आमदार फंडातून २५ लाख देतो अशी घोषणा पडळकरांनी उंडवडीत बोलताना केली.चौंडीमधील साजरी केली जाणारी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आजपर्यंत चौंडीला सर्व समावेशक जयंती होत होती,पण रोहित पवार आणि त्यांची पार्टी त्यात राजकारण आणत आहे. त्यामुळे त्यांनी जर असे काही करण्याचा प्रयत्न केला तर,त्यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी लाखो जनसमुदायाने चौंडीला येण्याचे आवाहन पडळकरांनी नागरिकांना केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *