पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
एका ठिकाणी मालमत्ता तारण ठेवली असतानाही त्याची बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेकडून कर्ज घेऊन ९८ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,ओमकार ब्रिजमोहन राठी,वय.४२ ( रा.हडपसर आणि ॲड.डी.डी. कुलकर्णी (रा. कोथरुड,पुणे )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेचे मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक गोपाल सर्वेसन एस वय.५१ वर्षे (रा.वानवडी,पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही कागदपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आणून न दिल्याने वकिलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१६ सप्टेंबर २०१४ पासून हा प्रकार सुरु आहे. ओमकार राठी याने बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी खोटे कागदपत्र जमा केली.अॅड. डी. डी. कुलकर्णी हे बँकेचे वकिल आहे. बँकेने त्यांच्याकडे ही कागदपत्रे तपासणीसाठी दिली होती.
त्यांनी मालमत्तेवर असलेले तारण बँकेच्या निदर्शनास आणून दिले नाही.राठी यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडे तारण ठेवण्यापूर्वी जनहित नागरी सहकारी पतसंस्था येथे तारण ठेवली होती.तीच मालमत्ता इंडियन ओव्हरसीज बँकेत तारण ठेवली. बँकेकडून ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले.कर्ज रक्कम व त्यावरील आजपर्यंत त्यावरील व्याज ३८ लाख ५८ हजार ९०० रुपये असे एकूण ९८ लाख ५८ हजार ९०० रुपयांची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.