पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे ग्रामीण पोलीस दलातील मंचर पोलीस ठाण्यात सहा.पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या एकनाथ ठकाजी वाजे,वय.५३ वर्षे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.एकनाथ वाजे यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास राजगुरुनगर जवळील चांडोली येथील घरात आत्महत्या केली. याबाबतची माहिती त्यांचे जावई आदित्य रविंद्र गभाले,वय.२५ यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य गभाले यांची पत्नी सुप्रिया या माहेरी आल्या होत्या बुधवारी आदित्य यांची पत्नी सुप्रिया हिने त्यांना फोन करुन सांगितले की, वडीलांनी शेजारी असणाऱ्या १३ नंबर प्लॅटमध्ये
स्वत:ला कोंडून घेतले असून, आम्ही बराच वेळ दरवाजा वाजवूनही ते दार उघडत नाहीत.त्यानंतर कुटुंबीयांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा तोडला.
त्यावेळी एकनाथ वाजे यांनी बेडरुममधील हुकाला रस्सीने गळफास घेतल्याचे दिसले.वाजे यांचा गळफास सोडून तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासून एकनाथ वाजे यांना मृत घोषित केले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत वाजे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.