Pune Breaking : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ ! मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईसह पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग यांची आई तसेच ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून स्व-मान्यता (बनावट) प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भा.द.वि
कलम ४२०,४६४,४६५, ४६६,४६८,४७०,४७१,२०१ आणि १२० (ब),३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत.तसेच या अकरा शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे २५% मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना देत,शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी गौतम शंकर शडगे,किशोर पवार,हेमंत सावळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.११ बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.आरोपींना सध्या अटक करण्यात आली नसून बंडगार्डन पोलिस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *