परभणी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर एका महिलेने मारहाणीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतजमीनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजते.गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“आमदार रत्नाकर गुट्टे हे आपल्या ३० ते ३५ साथीदारांसोबत आपल्या शेतात आले आणि त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून, मारहाण केल्याचं संबधीत महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. विनयभंग केल्याचंही या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.”आपल्यावर झालेल्या आरोपांना इन्कार आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. ‘जी जमीन अस्तित्वात नाही त्यावरून हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. हे राजकीय षडयंत्र असल्याचं रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे.