पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या उत्कृष्ट प्रशासक होत्या,अजित पवारांनी काढले गौरवद्वार..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हिंदु शेगर धनगर समाजाचा १९ वा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.सामुदायिक विवाह सोहळ्याला राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांचे मी बारामती तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून तालुक्याचे वतीने तमाम जनतेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो.लग्न विवाह होत असलेल्या नवदापत्याना सुखी व समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचे जावो भरभराटीचे जावो.
त्यांनी घराचं, आपल्या आई वडिलांचं नाव उज्वल करावे एक आदर्श पती-पत्नी म्हणून चांगला संसार करावा अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवदांपत्यांना दिल्यात. त्याचबरोबर नववरवधूला रोपटे देऊन पर्यावरणाचे संरक्षण करावे असा मोलाचा सल्ला दिलाय.यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले की,राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या उत्कृष्ट प्रशासक होत्या.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले,अनेक विहीरी,बारवा देखील बांधल्या.
एक महिला राज्यकर्त्या म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने एक नंबरला घेतले जाते.याच अहिल्यादेवी होळकरांच्या ३१ मे च्या जयंती दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी जाऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेय.. ते बारामतीत हिंदू शेगर धनगर समाज सामुदायिक विवाह सोहळ्यात बोलत होते,यावेळी अजित पवारांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेत गौरवोद्गार काढले आहेत..