मोठी बातमी ! १ जून पासून सहा प्रकारे कचरा वर्गीकरण न केल्यास व कचरा उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई : आयुक्त पि.शिवशंकर..!!


आयुक्त शिवशंकर यांनी घनकचरा विभागातील अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक घेण्यात आली.

भास्कर दामोदरे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

महानगरपालिकेमार्फत मागील दोन वर्षांपासून कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन केलेले आहे. मात्र नागरिकांकडून अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने महानगरपालिकेची अपेक्षित उद्दिष्टे पूर्ण झालेली नाहीत. या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना १ जून २०२२ पासून महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये कचऱ्याचे ओला कचरा,सुका कचरा,घरगुती घातक कचरा,घरगुती जैव – वैदकीय कचरा,ई-कचरा, प्लास्टिक कचरा अश्या सहा प्रकारे वर्गीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महापालिकेला नाइलाजास्तव दंडात्मक कारवाई करावी लागेल.

कचरा वर्गीकरण न केल्यास किंवा कचरा घंटागाडीत न टाकता उघड्यावर टाकल्यास तसेच उघड्यावर लघुशंका व रस्तावर थुंकणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत दंडात्मक कारवाई करून त्यांची साफसफाई करण्यास लावणे बाबतचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत.तसेच ज्या अपार्टमेंट,सोसायटी यांनी त्यांच्या गेट जवळ अश्या सहा कचऱ्याचे वर्गीकृत डब्बे ठेवावेत व घंटागाडी आल्यावर त्यामध्ये त्यानुसार त्यामध्ये कचरा टाकण्यात याव.असे न करणाऱ्या अपार्टमेंट सोसायटी यांच्या वर सुद्धा नियमोचित दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींप्रमाणे १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे कायद्यानुसार बंधनकारक केलेले आहे. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना,अपार्टमेंट व व्यापारी संकुले, हॉटेल, मंगल कार्यालय इत्यादी यांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याची कंपोस्टिंग करून विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे.’आश्या कचरा निर्मांत्यानी कोणतीही कार्यवाही न केल्यास त्यांच्या वर सोलापूर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’असे आदेश आला आहे.

तसेच सोलापूर शहरातील सर्व व्यापारी अस्थापना तसेच भाजी व फळ विक्रेते तसेच फुल बाजारामधील व्यापारी सर्व दुकानं, कंपन्या, शैक्षणिक संस्था, इत्यादी यांनी जर महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियमा नुसार प्लास्टिकबंदीचा नियमभंग करताना आढळल्यास पहिल्या नियम भंगाच्या वेळी आढळल्यास ५००० रुपये, दुसऱ्या नियम भंगाच्या वेळी आढळल्यास १०००० रुपये आणि तिसऱ्या नियम भंगाच्यावेळी आढळल्यास २५००० रुपये, सोबतच तीन महिन्यांच्या कैदेची तरतूद आहे. त्यानुसार शहरामध्ये प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक करवाई करणे बाबत आदेश दिलेले आहेत.या बैठकीस आयुक्त पि.शिवशंकर,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहा.आयुक्त विक्रमसिंह पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक हे सर्व उपस्थित होते.

बातमी कोट :

आयुक्तांमार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे नियमांचे पालन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे व आपल्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *