Social News : धनगर समाजाच्या महामंडळाला आर्थिक निधी द्यायचा म्हंटल की अर्थमंत्री अजित पवार यांच्या पेनातील शाई संपते का ?..ऍडव्होकेट गोविंद देवकाते


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्रा मध्ये दोन नंबरचा समाज असलेल्या धनगर समाजाला महाविकास आघाडीच्या सरकारकडून जाणीवपूर्वक वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतर समाजाच्या महामंडळांना महाविकास आघाडी सरकारकडून भरघोस निधी देत आहेत मात्र धनगर समाजासाठी असलेल्या महामंडळाला एकही रुपयाचा निधी या महाविकास आघडी सरकारने दिला नाही यावरून महाविकास आघाडीच्या सरकार कडून धनगर समाजाच्या बाबत द्वेषाचे राजकारण दिसून येत आहे.

यामुळे ३१ मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती अगोदर या महाविकास आघाडी सरकारने आणि या सरकारमधील अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी धनगर समाजाच्या महामंडळाला आर्थिक निधीची तरतूद करून मानसन्मान द्यावा.अन्यथा ३१ मे नंतर महाविकास आघाडी सरकारला धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा गर्भित इशारा भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अडव्होकेट गोविंद देवकाते यांनी राज्य सरकारला दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *