Socal News : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल : धनंजय मुंडे


दादर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दादर येथील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून,मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीचा आढावा धनंजय मुंडे यांनी घेतला.

स्मारक उभारणीचे काम जरी एमएमआरडीएकडे असले तरी राज्य शासनाने इंदू मिल स्मारक उभारणीच्या संनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तात्काळ एमएमआरडीएला वितरित करण्याचे निर्देश ही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.यावेळी शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *