खळबळजनक बातमी ! बारामती शिक्षण विभागात मोठी खळबळ; तब्बल ४८ मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती व विमुक्त भटक्या जाती जमातीतील इयत्ता पहिली ते चौथीतील काही विद्यार्थींनीना उपस्थिती भत्त्यापासून वंचित ठेवणाऱ्या ४८ मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,आणि तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केली आहे.शासननियमानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या अनुसूचित जाती जमाती व विमुक्त भटक्या जाती जमातीतील विद्यार्थींनीना दररोज एक रुपया यानुसार उपस्थिती भत्ता देणे अनिवार्य असताना देखील अनेक शाळांनी हा भत्ता दिला नाही.

शासन नियमानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या अनुसूचित जाती जमाती व विमुक्त भटक्या जाती जमातीतील विद्यार्थींनीना दररोज एक रुपया यानुसार उपस्थिती भत्ता देणे अनिवार्य होते.मात्र असे असताना देखील बारामती तालुक्यातील शाळांनी सन २०१८-२०१९ व २०१९-२०२० या दोन वर्षात अनेक शाळांनी हा भत्ता दिला नाही.याबाबत पोपट धवडे यांनी तक्रार केल्यानंतर देऊळगाव रसाळ या केंद्रात एकूण १५ शाळा कार्यरत असून,यातील ७ शाळांमधील विद्यार्थीनी उपस्थित भत्त्यापासून वंचित ठेवल्या असून,सोमेश्वर आणि निंबुत यामधील निंबुत केंद्रातील एकूण ९ शाळांपैकी ५ शाळा ह्या उपस्थित भत्त्यापासून वंचित ठेवल्या असून, सोमेश्वरनगर या केंद्रातील १७ शाळापैकी १० शाळा उपस्थित भत्त्यापासून वंचित ठेवल्या असून,तसेच मानाप्पावस्ती व शिवनगर येथील एकूण २२ शाळांपैकी १४ शाळा ह्या भत्त्यापासून वंचित ठेवल्या आहेत.यामुळे या केंद्रातील केंद्रप्रमुखांना खुलासा विचारण्यात आला आहे.

मात्र फक्त केंद्रप्रमुख नव्हे तर याबाबत कर्तव्यात कसूर करणारे तत्कालिन गटशिक्षणाधिकारी, या केंद्रप्रमुखांच्या कार्यक्षेत्रातील ४८ शाळांच्या मुख्याध्यापक यांच्यावरही कारवाई व्हायला हवी,अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद स्तरावरुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.मात्र वरिष्ठ अधिका-यांनीही याकडे दुर्लक्ष केलेले असून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी अशी धवडे यांची मागणी आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विनंतीवरुन आपण उपोषण मागे घेतले होते, प्रत्यक्षात काहीही कारवाई झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातमी कोट :

बारामती तालुक्यातील पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीना एक रुपया उपस्थिती भत्त्याच्या हक्कापासून दूर ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन होण्यासाठी मी माहिती अधिकारात माहिती मागून या प्रकरणी मा.शिक्षण आयुक्त,मा.शिक्षण संचालक प्राथमिक विभाग मा.मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्य कार्यालय यांच्याकडे पुरावे देऊन प्रकरण दाखल केले आहे आणि यात यश मिळाले असून यामध्ये चार केंद्र प्रमुखांवर दोषारोपण करण्यात आले असून इतर ४८ मुख्यध्यापकांवर कारवाई होण्यासाठी मी आझाद मैदान येथे २० तारखेला उपोषणास बसणार आहे.

पोपट धवडे ( माहिती अधिकार कार्यकर्ते बारामती )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *