Morgaon News : मोरगावच्या मयुरेश्वरास अक्षय तृतीया निमित्त ५० डझन आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट..!!


मोरगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट केली होती . श्रींच्या मुर्तीस आंब्यांच्या सजावटीसाठी गावातील व्यापारी , गुरव-पुजारी , गणेश भक्तांनी , तरुण मंडळ यांनी ५० डझन आंबे दिले होते . दुपारी ३ वाजता पुजेनंतर आंब्याची सुंदर आरास करण्यात आली होती. हे पाहण्यासाठी गणेश भक्त व परीसरातील भावीकांनी गर्दी केली होती .

आज अक्षय तृतीया निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मयुरेश्वर मंदीराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांसाठी खुला करण्यात आला .या दिवशीचा मुहूर्त साडेतीन मुहर्तापैकी एक समजला जातो यामुळे राज्यभरातील भावीक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. अक्षय तृतीया निमित्ताने श्रींस आंब्यांची आरस करण्याचे ठरल्यानंतर पेठेतील व्यापारी, तरुण मंडळ , गणेश भक्त व गुरव पुजारी यांनी पन्नास डझन आंबे जमा केले होते .

दुपारी तीन वाजता श्रींची पुजा करण्यात आली.यानंतर गौरव गाडे,अर्थव धारक,प्रथमेश गाडे,नंदू धारक,श्रेयश धारक,गुरव आठवडेकरी पुजारी महेश गाडे यांनी श्रींची पुजा करुन मयुरेश्वर व सिद्धी बुद्धी मातेस पोशाख चढविला.यानंतर सुमारे सहाशे आंब्यांची सुंदर आरास करण्यात आली.यामुळे मुर्ती गाभाऱ्यास वेगळी शोभा जाणवत होती.ही सजावट सुमारे दोन तास चालली होती.आंब्यांची आरास केलेला श्रींचा हा फोटो सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल झाला .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *