मोठी कारवाई ! पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी पकडले तब्बल २००० किलो गोमांस ; चौघांवर गुन्हा दाखल..!!


यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

केडगाव चौफुला येथील पुणे-सोलापूर हायवेवरून गोमांस घेऊन जाणारी पिकअप पकडून तब्बल सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयित आरोपी मोहित रियाजत खान (रा.नेहरूनगर,कुर्ला, कुरेशीनगर,उमरचाळ रूम नं.४१३,मूळ मुंबई,शंकरपूर उत्तर प्रदेश ) गनीलाल कुरेशी,सादिक कुरेशी दोघेही (रा.कुर्ला,मुंबई ),कलिम कुरेशी ( रा.इंदापूर,ता.इंदापुर, जि.पुणे ) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२९ (३४),महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (c),९(a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी गोरक्षक पीपल्स फॉर अनिमल्स या संघटनेचे कार्यकर्ते सचिन साहेबराव शित्रे, वय.३२ वर्षे ( रा.सर्व्हे क्र.२०५/१,गायरान पापडेवस्ती, भेकराईनगर,फुरसुंगी, ता.हवेली,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादींना गुप्त माहिती मिळाली होती की,केडगाव चौफुला येथील पुणे-सोलापूर हायवेवरून पिकअप गाडी क्र.MH.03.DV 1799 या गाडीमध्ये जनावरांच्या मांसाची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली असता,फिर्यादींनी त्यांच्या संघटनेत काम करणाऱ्या तिघांना बोलावून घेत, मिळालेली माहिती सांगुन पुणे सोलापूर हायवे जवळील केडगाव चौफुला येथील रोडवर पोलिसांच्या मदतीने थांबलो असता,दुपारी ०२.३० च्या सुमारास सोलापुर कडून पिकअप क्रमांक. MH.03.DV 1799 आल्याने गाडी थांबवत विचारणा केली असता,गाडीत जनावरांचे मांस असल्याचे चालकाने सांगितले.

गाडीत पाहणी केली असता,अंदाजे २ टन मांस असल्याची खात्री झाली.चालकाने गनीलाल कुरेशी व सादिक कुरेशी यांच्या सांगण्यावरून इंदापुरातील कलीम कुरेशी याच्याकडून घेत विक्रीसाठी चालवला असल्याचे चालकाने सांगितले.आरोपीच्या ताब्यातील अंदाजे २००० किलो दोन लाखांचे गोमांस आणि पाच लाखांची पिकअप गाडी असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत गोरक्षक निखिल दरेकर,मंगेश चिंचकर,शहादन मुलानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या गुन्ह्याचा पुढील तपास केडगाव चौकीचे सहाय्यक फौजदार जाधव हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *