खेड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
किराणा घेण्यासाठी दुकानात जात असताना,दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर भरधाव वेगाने येत गळ्यातील २ तोळे वजनाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पळून नेणाऱ्या संशयित आरोपी अजय राजु शेरावत,वय.१८ वर्षे ( रा. हिंगणगाव,ता.शिरूर,जि.पुणे ) याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून,याप्रकरणी मालती रामदास भगत ( रा. राजगुरूनगर,ता.खेड,जि.पुणे ) यांनी फिर्याद खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत सविस्तर माहितीनुसार,रक्षेवाडी येथे किराणा घेण्यासाठी गेलेल्या मालती भगत यांच्या गळ्यातील दोन अज्ञात इसमांनी चोरून नेलं होते,त्याबाबत तपास करीत असताना,गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की,या गुन्ह्यातील आरोपींनी वापरलेली मोटार सायकल ही शिरूर तालुक्यातील हिंगणगाव येथील एक जण वापरत असलयाचे समजले. त्यावरून त्याठिकाणी सापळा रचत अजय शेरावत याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा साथीदारसोबत केला असल्याचे सांगितले आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासाकामी खेड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, खेड उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार अतुल डेरे,विजय कांचन, पोलीस नाईक बाळासाहेब खडके,अमोल शेडगे पोलीस कर्मचारी धिरज जाधव,दगडू विरकर,महिला पोलीस कर्मचारी पूनम गुंड यांनी केलेली आहे.