बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती शहरात मोठ्या प्रमाणवर गुटख्याची विक्री होत असल्याच्या माहितीवरून उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी शहरातील टपऱ्यांवर छापा टाकत तीस हजारांचा गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी वैभव भागवत साळवे यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपी सलमान दिलावर झारी,वय.२९ वर्षे(रा.साठेनगर),गुलाब मधुकर खरात,वय.२० वर्षे (रा.साठेनगर,कसबा),रोहित विठ्ठल गुळमकर, वय.३२ वर्षे (मोरगाव रोड) प्रमोद आण्णा भिंगारे,वय.५१ वर्षे (सावतामाळी नगर,कसबा),सत्तार खलीब काजी, वय. ७६ (रा.सिकंदरनगर,कसबा),प्रकाश मारुती चांदगुडे, वय.३४ वर्षे (रा.श्रीरामनगर, कसबा),गजानन शिवराम बनकर,वय.६३ वर्षे (रा.दत्तवाडी, मोरगाव रोड) प्रतिक अनिरुद्ध खटावकर,वय.३० वर्षे (रा.दत्तवाडी,गुणवडी रोड),रमेश अशोक चौधरी, वय.४२ वर्षे (रा.ढवाण
शाळेसमोर,मोरगाव रोड),मिलिंद शिवाजी बारवकर, वय.२९ वर्षे (रा.खंडोबानगर,नंदन पेट्रोल पंपाजवळ), दादा लक्ष्मण पवार,वय.६२ वर्षे (रा.सातववस्ती,कसबा,) दादा बाबुराव सोनवणे, वय.६० वर्षे ( रा.स्टेडियम शेजारी विमल रमेश खेडकर, वय.७० वर्षे (रा.स्टेडियम शेजारी) या तेरा जणांवर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १८८, २७२,२७३,अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६,२६ (२),(iv),३० (२) (a) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,उपविभागीय अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,बारामती शहरांत वेगवेगळ्या दुकानांमध्ये व पान टपरीमध्ये काहीजण गुटख्याचा बेकायदा साठा करून त्याची विक्री करत आहेत.उपविभागीय पथकाने तात्काळ जात शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दुकानांवर व पान टपरीवर छापा टाकला असता, काही जण आपल्या दुकानांमध्ये, पान टपरीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे गुटखा विक्री करीत असताना मिळून आले. यामध्ये हिना किराणा स्टोअर्स येथे १०८७७ रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटख्याचा मुद्देमाल मिळुन आला.
गुलाब खरात यांच्या साठेनगर या श्री स्वामी समर्थ स्टेशनरी जनरल स्टोअर्स या दुकानात एकूण २१३२ किंमतीची गुटखा मिळून आला.रोहित गुळुमकर यांच्या स्नेहा पान शॉपमध्ये ५५० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.प्रमोद भिंगारे यांच्या काशीविश्वेशर या पान टपरीमध्ये एकूण ६९५ रुपयांचा गुटखा मिळून आला. सत्तार काझी यांच्या सिकंदरनगर येथील पत्र्याचे शेडमध्ये मोठ्या एकूण ८२३ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. प्रकाश चांदगुडे यांच्या भोले पान शॉप मध्ये एकूण ३११० रुपयांचा गुटखा मिळून आला.गजाजन बनकर यशवंत किराणा दुकानात एकूण ७५३ रुपयांच्या गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला.
प्रतिक खटावकर याच्या खंडोबानगर येथील आर.के पान शॉपमध्ये एकूण १७९० च्या गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला.रमेश चौधरी यश प्रोव्हिजन स्टोअर्स पान टपरीत विमल पान सह एकूण १४८५ रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला.मिलींद बारवकर यांच्या मिलींद VIP फेटा या दुकानात एकूण १७०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.दादा पवार खंडोबानगर येथील जुन्या टोलजवळ असलेल्या शिवम पान शॉप मध्ये १८०० रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला.दादा सोनवणे गणेश पान टपरीत एकूण २२१० रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला.
विमल खेडकर यांच्या प्रज्वल्ल स्टोअर्स नावाचे दुकानांत असा एकूण ११८० रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल मिळुन आला.यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल २९ हजार १०५ रुपयांचा पान मसाला गुटखा मिळून आला. असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपअधीक्षक बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.सी. पथक ४ याचे कर्मचारी सहा.फौजदार बनसोडे,पोलीस कर्मचारीशिंदे,ठोसरे,शिंदे,दराडे,वीरकर,मिरकले,काळे, बोबडे,रत्नपारखी,करचे,जगताप,दरवडे तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे दशरथ कोळेकर,पवार यांच्या पथकाने केलेली आहे.