सासवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कोंडीत गावात पूर्ववैमनस्य व आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून धायरीगावातील हसन शेख यांच्यावर गावठी कट्ट्यातून फायरिंग व धारदार शस्त्राने वार खून करणाऱ्या आरोपी गोविंद गजेंद्र वाघमारे ( रा.जांब,ता. परांडा,जि.उस्मानाबाद ) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले असून,त्यांच्यासह इतर १४ ते १५ आरोपीवर सासवड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट ३(२५),४ (२५) तसेच भा.द.वि कलम ३०२ प्रकरणी गुन्हा दाखल असून,हा गुन्हा गंभीर असल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ३(१)(¡¡) ३(४) कलम लावण्यात आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,कोंडीत गावात पूर्ववैमनस्यातून आरोपी मंगेश कदम ( रा.कोल्हेवाडी, ता. हवेली,जि.पुणे ) याच्यासह १४ ते १५ जणांनी धायरी गावातील हसन शेख यांचा गावठी कट्टा आणि धारधार शस्त्राने वार करत खून केला होता.या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी तात्काळ अटक केली होती.परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मंगेश कदम व त्याचा साथीदार गोविंद वाघमारे फरार होते.त्यामुळे ह्या दोघांना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते.
हा गुन्हा गंभीर असल्याने या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक हवेलीत फरार आरोपींचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल शेडगे यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली की,या गुन्ह्यातील आरोपी गोविंद वाघमारे हा कोल्हेवाडीत येणार आहे.त्याप्रमाणे सापळा रचत गोविंद वाघमारेला ताब्यात घेत पुढील तपासासाठी वैद्यकीय तपासणी करत सासवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,भोर पोलीस उपधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस नाईक अमोल शेडगे,बाळासाहेब खडके, पोलीस कर्मचारी धिरज जाधव,महिला पोलीस कर्मचारी पूनम गुंड यांच्या पथकाने केलेली आहे.