बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात आता कायदेशीर कारवाईच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे.यातील तक्रारीचा पहिला भाग म्हणून क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई,महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी पी.अनबलगन यांना लेखी तक्रारी अर्जाद्वारे या भूखंड घोटाळ्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारी अर्जामध्ये X-13 आणि AM-9 या दोन भूखंडामध्ये दोन किमीचे अंतर आहे. मग लिलाव X13चा लिलाव झालेला असताना ताबा AM 9चा देण्यात आला आहे.या दोन्ही भूखंडाचे मूल्यांकन वेगळे असताना एकाच भूखंडाची अदलाबदली कशी होऊ शकते.यामध्ये एमआयडीसीचे रचनाकार असलेले अविनाश पाचपुते यांचे वडील आदिनाथ पाचपुते हे या मयुरेश्वर असोसिएट मध्ये पार्टनर कसे काय ? या भूखंडात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
प्राईम लोकेशन चा भूखंड मातीमोल दराने का दिला हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या भूखंड अदलाबदली मध्ये एमआयडीसी च्या अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले झाले असल्याचे खासगीत चांगलीच चर्चा आहे.बारामतीतील या भूखंड प्रकरणामुळे एखच खळबळ उडाली असून या भूखंडाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती.मात्र आता या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यामुळे प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे या प्रकरणात आम्ही राज्यसरकारकडे तक्रार केली असून राज्य सरकारने तातडीने कारवाई न केल्यास आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.असं तक्रारदार मच्छिन्द्र टिंगरे सांगितले आहे.त्यामुळे बारामतीच्या या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणावर राज्य सरकार काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.