Rasta Roko : वीज मंडळाच्या गलथानपणाचा निषेध करण्यासाठी शेतकर्‍यांचा शेवगाव गेवराई राज्य मार्गावर बालमटाकळीत दोन तास रास्ता रोको..!!


शेवगाव : प्रतिनिधी ( जयप्रकाश बागडे )

बालम टाकळी विजमंडळाच्या कार्यालया अंतर्गत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना शेती पंपाला कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभ्या पिकांची नासाडी होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवगाव गेवराई राज्य मार्गावर बालम टाकळी येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते, मात्र राज्यपातळीवर कोळसा टंचाईमुळे वीज टंचाई निर्माण झाल्याने इमर्जन्सी लोडशेडिंग लागल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे अधिकारी व शेतकरी यांची बैठक करूनच हा तोडगा दूर करू असे उपकार्यकारी अभियंता लोहारे साहेब व सहाय्यक अभियंता पंकज मेहता यांनी सांगितले,

वीज मंडळाच्या गलथानपणाचा कळस वाढत चालल्याने शेतातील ऊस ,बाजरी आदी इतर पिकांची डोळ्यादेखत पिकांची नासाडी होत असल्यामुळे संतप्त झालेले शेतकरी हे वीज मंडळाच्या गलथान पणाचा कळस दूर करण्यासाठी शेवगाव गेवराई राज्य मार्गावर बालमटाकळीत दोन तास रस्ता रोको केल्यामुळे वाहनांची दुतर्फा रांग लागली होती.शेवगावचे उपकार्यकारी अभियंता लोहारे,सहा.अभियंता पंकज मेहता यांनी शेतकऱ्यांना लेखी निवेदन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

उपकार्यकारी अभियंता लोहारे साहेब म्हणाले की, बालमटाकळी उपकेंद्रातील फिडर संदर्भात कायमस्वरूपी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी एक दीर्घकालीन योजनेतुन नवीन पेपरची मागणी करावी लागेल नवीन फिल्टर चे अंदाज पत्रक हे वरिष्ठ कार्यालयाकडून योजनेला मंजुरी प्राप्त झाल्यावरच या फिल्टर चे अंदाज पत्रक तयार करून पाठविण्यात येईल जेणेकरून यामुळे आपला वीज पुरवठा अखंडितपणे चालू राहण्यासाठी मोठी मदत होईल, वरिष्ठ स्तरावरूनच विजेची कपात होत असल्याने पर्यायाने त्याचा फटका सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याने विजमंडळास सहकार्य करण्याचे आवाहनही लोहारे यांनी केले आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख , चंद्रकांत आबा गरड, सेवा संस्थेचे अध्यक्ष हरीश्चंद्र घाडगे , रतनराव देशमुख , रंगनाथ वैद्य , रोहीदास भोंगळे, बाळासाहेब देशमुख अनिल परदेशी, सुदामराव शिंदे, प्रशांत देशमुख ,दत्ता भिसे ,बाळासाहेब जाधव भानुदास नाना गलधर, रामजी पाथरकर , अशोक वैद्य ,विक्रम बारावकर , आबासाहेब काळे, भैया देशमुख ,आदींसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वीज मंडळाचे कर्मचारी झुंबर खेडकर , महेमूद शेख, पवार आदींसह बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे ,पोलीस नाईक उमेश गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *