वाढदिवस विशेष ! यशवंत सेनेचे सरसेनापती ते राज्याचा कॅबिनेटमंत्री असा महादेव जानकरांचा खडतर प्रवास एकदा नक्की वाचा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

१९ एप्रिल १९६८ मध्ये माण तालुक्यातील पळसावडे येथे जन्म झालेले महादेव जानकर यांनीबअहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथील या ठिकाणी एका नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली. पक्षाच नाव होतं,रासप.४ सप्टेंबर २००३ रोजी निवडणूक आयोगाकडे रितसर पक्षाची नोंदणी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते महादेव जानकर.रासपचा एक काळ असा होता जेव्हा एखाद्या जिपड्यातून,गावात येणाऱ्या शेवटच्या एस्टीतून नायतर एस्टी चुकली म्हणून पायी वाड्या वस्त्यावर एक तरुण यायचा.गावातल्या एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी सुरवात केली.

यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली.नाराज झालेल्या तरुण धनगर समाजाच्या मुलांनी यशवंत सेना पुनरुज्जीवीत करण्यास सुरवातीच्या काळात वाघे यांच्याकडे या सेनेचे सरसेनापतीपद देण्यात आलं. त्याचं निधन झालं आणि सरसेनापती म्हणून महादेव जानकर यांची नियुक्ती करण्यात आली.सरसेनापतीपद आल्यानंतर गरिबा घरच्या या फाटक्या तरुणाने महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरवात केली.महाराष्ट्राचा कानाकोपरा पालथा घालायचा हा विचार करुन महादेव जानकर फिरत राहिले. गाव,वस्त्या,वाडे फिरले.आज अस सांगितल जातं की एकही गाव अस नाही की जिथे महादेव जानकर गेले नाहीत.बस मिळाली तर बस, कुणाच्यातरी मोटार सायकलला हात करायचा नाहीतर पायी गावात जायचं या सुत्राने महादेव जानकरांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

सळसळत रक्त असणाऱ्या समाजातील तरुणांची मोट बांधण्यास सुरवात केली.मुख्य धारेतील राजकारणाच्या पलीकडे राजकारण वाढवण्याच काम जानकर करत होते.महादेव जानकर नावाचा तरुण महाराष्ट्राबाहेर
फिरत फिरत उत्तरप्रदेशात पोहचला.तिथे कांशीराम त्यांचे नेते झाले. नुसते नेते नाहीत तर काशीराम यांनी महादेव जानकरांच्या डोक्यावर आपला हात ठेवला. काशीराम यांनी मायावतींनी मानसकन्या माणले होते. त्यांनी महादेव जानकरांना मानसपुत्र मानले.बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा महादेव जानकरांवर कृपाशिर्वाद राहिला.कटगुण येथे कांशीराम यांच्या उपस्थितीत जानकरांनी भव्य असा मेळावा घेतला.
जानकरांनी ज्या प्रकारे महाराष्ट्र फिरला त्याचप्रकारे त्यांनी भारतभ्रमण करण्यास सुरवात केली.इथे त्यांच्यासोबत स्वत: कांशीराम असायचे. त्यांच्या सानिध्यात ते भारतभर फिरू लागले. त्यांच्या सहवासात जानकरांचा “राजकारणाचा पाया” पक्का होतं गेला.

१९९५ च्या लोकसभेत नांदेड लोकसभा मतदारसंघातून अॅड हरिभाऊ शेवाळे भारिप बहुजनचे उमेदवार होते. केवळ १० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. हा अंदाज घेवून १९९८ साली नांदेड लोकसभा मतदारसंघातून जानकरांनी बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. बसपासोबत राजकारण करण्याचा विचार करणाऱ्या जानकरांना इथे पहिला धक्का बसला. जानकरांच डिपॉझिट जप्त झालं. याच ठिकाणावर रासपच्या जन्माची कथा आकारास आली.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दौंड मतदार संघातून राहूल कूल हे निवडून आले आहेत. ब्राह्मण –मराठा ते जैन – मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. “एकात्म राष्ट्र निर्माण” हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनाविले आहे. त्याच बरोबर पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सन २०१४ ची लोकसभा महाराष्ट्रातील बारामती लोकसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये वर्षानुवर्षे राजकारणात आघाडीवर राहिलेले नाव म्हणजे शरद पवार व नेहमीच ३ ते ४ लाखांची आघाडी घेणारेच्या बालेकिल्यात जवळ पास ५ लाखापर्यंत मतदान मिळवून राजकिय भूकंप घडविला. त्या पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये दौंड मधून रासपचे उमेदवार राहुल सुभाष कुल हे १४ हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले.आज रासपची घोडदौड चालू असून येणाऱ्या २०१९ ला सत्तेत जरी राहता आले नाही, तरी विरोधी पक्ष म्हणून का होईना मजल मारण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व जाती धर्माला, व बहुजन वर्गाला राष्ट्रीय समाज पक्षाचा चांगलाच जनाधार मिळत चालला आहे.

अशा बहुजन नायकाला आणि एका मा.कॅबिनेट मंत्री असलेले आदरणीय महादेवजी जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *