बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
माजी केंद्रीय कृषिमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कामगारांना भडकावत केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी निषेध मोर्चे, निषेध आंदोलने करणयात आली. याच पार्श्वभूमीवर आज बारामतीत बारामती तालुका कामगार संघटनेच्या आणि संयुक्त कृषी समितीच्या वतीने एमआयडीसी मध्ये पेन्सिल चौक येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.यावेळी विविध कामगार संघटनेच्या युनियन अध्यक्षांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी,कामगार नेते तुकाराम चौधर यांनी निषेध व्यक्त करताना म्हणाले की,महाराष्ट्रातील कामगारांना मी आवाहन करतो की,वकील गुणरत्न सदावर्तेंनी जर बारामातीत येत पाऊल टाकला,तर त्याची जो कोणी जीभ हासडल त्याला ११ लाखांचे बक्षीस दिले जाईल आणि जी कोणी महिला कर्मचारी सदावर्तेंला बांगड्या भरेल त्या महिला कर्मचाऱ्याला तब्बल ५ लाखांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा बारामतीत कामगार नेते तुकाराम चौधर यांनी केली.यासोबतच फेरेरो कंपनीचे युनियन अध्यक्ष नानासो बाबर यांनी देखील निषेध व्यक्त करताना,जर चौधर साहेब ११ लाख देत असतील,तर आमच्या युनियन तर्फे जो कोणी सदावर्तेंच्या तोंडाला काळे फासेल त्याला आम्ही ५१ हजारांचे बक्षीस जाहीर करतो असे नाना बाबर यांनी जाहीर केले.
यानंतर तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देत सदावर्तेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे येत्या काळात जर पवार साहेबांच्या अस्मितेला जर बारामतीत येत कोणी धक्का पोहचवणार असेल तर त्याला अंगावर घेतल्याशिवाय बारामती मधील कामगार गप्प बसणार नाहीत.यावेळी एमआयडीसी मधील बहुसंख्य कामगार संघटना आणि कामगार उपस्थित होते.