सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्या प्रकरणी भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी महादेव पिराजी भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दत्तात्रय,महेश बाेराटे व इतर दाेघांविराेधात अॅट्रॉसिटी कलम (३- १ जी) अंतर्गत तसेच कलम ४२०, ४६७, ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार जयकुमार गाेरे हे नुकतेच सातारा जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष झाले आहेत.त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सातारा जिल्ह्यातील भाजपच्या गाेटात एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी दिली.