इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ज्याप्रमाणे सामान्य आजारांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जाते त्याचप्रमाणेच डोळ्यांच्या स्वास्थ्याकडेही लक्ष दिले पाहीजे,याच अनुषंगाने उद्धट गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त उद्धट गावातील भिमयोद्धा प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मधुमेहाच्या आजारामुळे लोकांना अंधत्व रोखता येत नाही.
पण त्यातून अंधत्व रोखण्यासाठी नेत्रतपासणीचे जाळे निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमावर भर देण्यासाठीच गावातील युवकांनी आणि भिमयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला असल्याची माहिती उद्धट गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश मखरे यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.नेत्रउपचाराच्या सुविधा ह्या शहरी भागांमध्ये केंद्रीत झाल्या आहेत;मात्र आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून उपचारांच्या या सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहचविण्याचा हा आमचा छोटा उपक्रम असल्याचे देखील मखरे यांनी आवर्जून सांगितले.
यामुळे या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि अशा मोफत नेत्रशिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून, अशा सुविधा घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागते.आणि गोरगरिबांकडे पैसे नसल्याने अशा सुविधांपासून हे लोक वंचित राहतात.त्यामुळे या शिबिरात गोरगरीब लोकांनी आणि गावातील लोकांनी सहभागी व्हावे जेणेकरून याचा लाभ त्यांना मोफत घेता येईल.
या कार्यक्रमाचे आयोजन भिमयोद्धा प्रतिष्ठान उद्धट यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हितेश मखरे,नितीन साळवे, सतीश लोंढे,सागर खरात,विशाल खरात,कुणाल मोरे,विशाल निकम यांनी केलेले आहे.