मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाण्यामध्ये मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेची मंगळवारी झालेली उत्तर सभा चांगलीच चर्चेत आहे.राज यांनी या सभेत तलवार दाखवली होती. या प्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेसह सात ते आठ जणांवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत १२ एप्रिलला गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली. राज ठाकरेंसह ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’