Indapur Crime : इंदापुरात पोलिसांनी रामनवमी दिवशी कत्तलीसाठी नेणाऱ्या २२ जनावरांना दिले जीवदान…आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापुरात रामनवमी दिवशी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास कत्तल करण्याच्या उद्देशाने महिंद्रा पिकअप मधून तब्बल २२ जर्शी गायीची लहान वासरे दाटीवाटीने घेऊन जात जात असताना,रविवारी (दि.११) वाहन चालक राजेंद्र सावळाराम वाघमोडे,वय. ३८ वर्षे ( रा.माळेगाव कॉलनी लक्ष्मीनगर, ता.बारामती,जि.पुणे ) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५३ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ),५ (ब),९ सह पशु संरक्षण अधिनियम १९५१ चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सलमान बाबूलाल खान यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत इंदापुर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,श्रीराम नवमीचा बंदोबस्त करीत असताना, पोलीस निरीक्षक मुजावर यांना बातमीदारमार्फत बातमी मिळाली की,बारामती- इंदापुर रोडने कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत आहे.त्याअनुषंगाने पोलीसांनी इंदापुर बारामती बायपास जवळील ब्रिजजवळ जात नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली असता, पावणे आठच्या सुमारास बारामतीकडुन येणारी एक संशयित पिकअप क्र.एम.एच.४२ ए.क्यू ४६१४ ही बारामती रोडने आली असता,पिकअप जवळ जात पिकअपची पाहणी केली असता,गाडीला पाठीमागुन ताडपत्री बांधलेली होती.

ताडपत्री सोडत पाहणी केली असता, पिकअपमध्ये जर्शी गाईची तब्बल २२ लहान वासरे मिळुन आली. त्याची चौकशी केली असता,त्याने राजेंद्र वाघमोडे असे नाव सांगितले.त्यावेळी त्याला वाहनातुन खाली उतरण्यास सांगितले असता,पोलिक कर्मचाऱ्याला धक्का देत त्याने शेजारील काटवनात पलायन केले.पोलीसांनी त्याचा शोध घेतला.परंतु तो मिळुन आला नाही.वाहनात पाहणी केली असता,जर्शी गाईची अंदाजे ४४ हजारांची २२ वासरे मिळून आली.त्यांना चारा पाण्याची सोय न करता ती दाटीवाटीने भरुन कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जाणारे ३ लाखांचे महिंद्रा पिकअप वाहन क्र.एम.एच. ४२. ए.क्यू.४६१४ असा तब्बल ३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

त्याच्याकडे चौकशी करीत असताना,त्याने धक्का मारुन रोडवर खाली पाडत,अंधाराचा फायदा पळुन जावुन सरकारी कामात अडथळा आणला आहे.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.याबाबत अधिक तपास इंदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाडुळे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *