Big Breaking : बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात ;लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..!!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल १ लाखांची मागणी करत,५० हजारापर्यंत तोडजोड करण्याची भूमिका दाखवत तडजोडीअंती वीस हजारांची लाच स्वीकारताना तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला आणि एका खासगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आलेली आहे.अशी माहिती मिळत आहे.

विलास धोत्रे ( वय.३४ ) असे लाच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे.त्याच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनूसार तक्रारदार याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल एका लाखांची मागणी केली होती,मात्र तक्रारदाराने माझ्याकडे एवढे पैसे नाहीत साहेब…मी वीस हजारांच्या आसपास रक्कम देतो असे म्हणत तडजोडी अंती तब्बल वीस हजारांची रक्कम देण्याचे मान्य झाले असता,तडजोडीअंती तब्बल वीस हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला आणि एका खासगी इसमाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्याची देखील चर्चा सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *