बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फेसबुक अकाउंट वरून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक शिवीगाळ करणाऱ्या कमेंट करणाऱ्या पंधरा जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम २९४,५००,५०१,५०४,५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी नितीन संजय यादव,वय.३० वर्षे (रा.करंजेपूल,ता.बारामती,जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली असून,यामध्ये संशयित आरोपी सतीश वर्तक,विश्वजित इंद्रदेव पोटफाडे, विपुल भोंगळे,विनोद पवार, विजय भोंगे,रजनीकांत राठोड, सचिन भैय्या तिप्पाटे पाटील, शंतनू घनवट,प्रसन्ना निजामपूरकर,ओंकार देवरगावकर, आशुतोष भिताडे, हरिष शेटे,कुणाल महाडिक,गणेश चोरमारे,अभिजित देशमुख असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजेपूल या ठिकाणी राहणाऱ्या काही इसमांनी द काश्मीर फाईल्स हा
केंद्र सरकारने “द कश्मीर फाईल्स” करमुक्त करावा आणि अजित पवार,अशा फेसबुकवरील पोस्टच्या यातील काही आरोपींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अब्रुनुकसान कारक आहे हे माहीत असताना देखील सर्व फेसबुक अकाउंट धारक व्यक्तींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अश्लिल आक्षेपार्ह,बदनामीकारक शिवीगाळ करणा-या कमेंट फेसबुकवर आणि सार्वजनिक समाज माध्यमावर पोस्ट केल्या आहेत.म्हणुन सर्व फेसबुक अकाउंटधारक लोकांविरोधात कायदेशीर फिर्याद दिली आहे.या
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.