Big Breaking : सरकारी बाबूच्या घरात सापडले तब्बल सव्वा किलो सोने आणि १.३६ कोटी रोकड..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

ओरीशातील दक्षता पथकानं एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता,त्याच्या घरी तब्बल सव्वा कोटी किलो सोने आणि १.३६ कोटी रुपयांची रोकड लागली.मलकानगरीमध्ये वास्तव्यास असलेल्या अभियंता आशीष कुमार दासला गेल्या आठवड्यात शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं.त्यावेळी दास डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकाला १०.२३ लाख रुपये देण्यासाठी गेला होता.दासला ताब्यात घेतल्यानंतर दक्षता पथकानं त्याच्याकडे असलेल्या काळ्या पैशांचा शोध सुरू केला.

चार दिवसांनंतर दासशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू सापडल्या. कारवाईत १.३६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाचे संचालक वाय. के.जेठवा यांनी दिली.दास यांनी कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या नावे ऍक्सिस बँकेत १२ खाती उघडून जवळपास २.२५ कोटी रुपये टाकले आहेत.

ही सगळी खाती दास स्वत: पाहायचे. यासोबतच त्यांनी एफडी, बचत खातीही उघडली होती. त्यात ४ कोटी रुपये आहेत.दासनं त्याच्या पत्नीच्या नावे कटकमधल्या शांतीवन सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला. त्याची किंमत ३२.३० लाख रुपये आहे. पत्नीच्या नावे केओन्जर जिल्ह्यातल्या बारिपाल येथे भूखंडदेखील खरेदी केला होता.अन्य बँक खाती आणि दोन लॉकर्सच्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *