महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच,विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देत त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.शिक्षणाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना चिचपल्ली गावाजवळ शिक्षक श्रीनिवास नरसय्या मचेडी,वय. ५० वर्षे यांच्यासह आरोपी शंकर बलय्या घंटा,वय.२९ वर्षे ( दोघेही रा.तेलंगणा ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या कारवाईत सुमारे १०३ किलो ८३९ ग्रॅम गांजासह सुमारे ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.परराज्यातून गडचिरोली मार्गावरून चंद्रपूरकडे दोन चारचाकी वाहनांतून गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार करून मूल-चंद्रपूर रोडवर चिचपल्ली गावजवळील ढाब्याजवळ पाळत ठेवली.
तपासणी दरम्यान, वाहनांत ५१ पाकिटांमध्ये १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१ लाख १५ हजार १७० रुपये किमतीचा गांजा आढळला. दोन्ही वाहनांसह सर्व ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.