मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ठाकरे सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढत असून,यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाई बाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली,यामध्ये ही कारवाई फक्त राजकीय दबाव सुडबुद्धी पोटी कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि आम्ही विरोधंकाना झुकवू शकतो हे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जिथे भाजपची सत्ता नाही तिथे तिथे या कारवाया होत आहेत. सर्वाधिक कारवाया या भाजपचं शासन नसणाऱ्या राज्यात होत असल्याचं संजय राऊत म्हणाले.
ते म्हणाले,श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातील आहेत, त्यांना कुठलीही नोटीस न देता कारवाई केली, आम्ही तुम्हाला झुकवू शकतो,हे दाखविण्याचं काम ED कारवाईच्या माध्यमातून होत आहे.ज्या राज्यात सत्ता येऊ शकली नाही त्या ठिकाणी दबाव आणून कारवाई केली जात असून ही राक्षसी प्रवृत्ती असल्याचं राऊत म्हणाले.केंद्रात भाजप सरकार आल्यापासून ईडीच्या कारवाई वाढल्या आहेत.महाराष्ट्र,पश्चिम बंगाल,झारखंड, तामिळनाडू या भागात कारवाया वाढल्या,न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही,न्यायालय सुद्धा दबावाखाली आहेत असा गंभीर आरोपही राऊतांनी केला.
तानाशाही सुरू आहे,चार राज्यात जिंकले म्हणजे तानाशाही असं होतं नाही.आम्हाला सर्वांना जेल मध्ये टाकून द्या, आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढायला तयार आहे. ईडी सारख्या एजन्सीचा दुरुपयोग योग्य नाही, ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया या राजकीय सूडाच्या कारवाया सुरू असल्याचंही राऊत म्हणाले. ईडीकडे, पंतप्रधान कार्यालयाकडे घोटाळ्याचे अनेक पुरावे आणि माहिती दिली आहे, मात्र बंदूक फक्त आमच्यावर रोखली जात आहे अशी खंतही राऊतांनी व्यक्त केली.