Political Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मतदारसंघासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी उत्तम दर्जाचे तयार करून घेणारे म्हणूम ओळखले जातात. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी तब्बल २१०० कोटींहून अधिक जास्तीच्या निधीची मंजुरी दिली आहे.यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदार संघातील असणाऱ्या रस्त्यांसाठी तब्बल ७७८.१८ कोटींची मंजुरी देण्यात आल्याचे ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील NH-752H च्या चिखली – दाभाडी – तळेगांव – पाल फाटा या ३७.३६० किमी रस्त्याचे २-लेन तसेच ४-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी ३५०.७५ रुपये कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील NH-१६० च्या उंडेवडी कडे पठार ते देशमुख चौक व ढवाण पाटील चौक (बारामती) ते फलटण या ३३.६५ किमी रस्त्याचे ४-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. ७७८.१८ कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील NH-१६ A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड – भोकर – हिमायतनगर – किनवट तसेच माहूर – अरणी रोड या रस्त्याचे २-लेन तसेच ४ – लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी २०६.५४ कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ढवळी ते गडचिरोली रस्त्याच्या NH-९३० वरील ढवळी ते राजोली, पांधसाळा ते मोहडोंगरी, आंबेशिवणी फाटा ते बोदली आणि मेड तुकुम ते गडचिरोली या २८ किमी लांबीच्या सध्याच्या महामार्गाचे २L+PS/४ लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी ३१६.४४ कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *