दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या कॅटॅलिस्ट रुममधून अज्ञात चोरट्याने अमेरिकन कंपनीकडून आलेले २० किलो रोडिअम ऑन ॲल्युमिना नावाचे तब्बल ५ कोटी ४७ लाख २० हजार ३४५ रुपये किंमतीचे केमिकल चोरीला गेले असून यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी इटर्निस फाईन केमिकल्स कंपनीचे कर्मचारी विष्णु बाजीराव डुबे ( रा.रक्षकनगर,गोल्ड बिल्डींग नं.B-३,फ्लॅट नं.३०३ खराडी, पुणे ) यांनी फिर्यादी दिली असून,पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,२४ डिसेंबर २०२० ते ६ जाने. २०२२ या कालावधीत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या प्लॉट नं.डी/९/१,९/२, ९/३ आणि डि/१५ मधील कॅटॅलिस्ट रुममधून २४ डिसेंबर २०२० रोजी आलेले १ कोटी ५० लाख ८६ हजार ९४३ रुपयांचे १० किलो आलेले जॉनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बॉक्स त्याची एका किलोची किंमत १५ लाख ८ हजार ६९४ होती.तर २ सप्टेंबर २०२१ रोजी आलेले
रोडिअम ऑन अल्युमिनियम हे १० किलो केमिकल त्याची किंमत ३ कोटी ९६ लाख ३३ हजार ४४२ रुपये आहे.
त्यांची प्रत्येक किलोची किंमत ३९ लाख ६३ हजार ३४४ रुपये प्रमाणे होती.ते जॉनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बॉक्स होते.दोन्ही मिळून ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रुपये किंमतीची चोरी झाली. याप्रकरणी कंपनीच्या वतीने बुधवारी (ता.१६) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक सुशिल लोंढे करीत आहेत.