बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली असून,या कारवाई संशयित आरोपी आकाश उर्फ ढग्या भोसले ( रा.आमराई,ता.बारामती ) किरण कांबळे ( रा.गुणवडी,ता.बारामती ) सागर जाधव पूर्ण नाव माहीत नाही ( रा.गुणवडी,ता.बारामती ) मुकेश पवार ( रा.खंडोबानगर,ता.बारामती ) संदीप सकट पूर्ण नाव माहीत नाही ( रा.गुणवडी,ता.बारामती ) यांना ताब्यात घेतले असून,बारामती शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.कारवाईत तब्बल १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेला मिळाली असता,शहर पोलिसांच्या मदतीने अड्ड्यावर छापा मारला असता, तिघांना ताब्यात घेतले असून, कारवाईत रोख रक्कम १३२००, तीन मोबाईल हँडसेट अंदाजे किंमत ११००० रुपये,दोन मोटर सायकली ८०,००० रुपये किमतीचे,दोन बॉल पेन १० रुपये किंमतीचे असा तब्बल १ लाख ४ हजार २१० किंमतीचा मटका,जुगारचा मुद्देमाल मिळुन आला आहे.हा मुद्देमाल व संशयित आरोपी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर क्षिरसागर,रविराज कोकरे,पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे,चालक सहा.फौजदार मुकुंद कदम तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर,सहाय्यक फौजदार
प्रदीप काळे,पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांनी केलेली आहे.