Pune Crime | बारामती तालुक्यातील स्कूल बसचा दौंड तालुक्यात अपघात; सात वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दौंड तालुक्यातील पडवी हद्दीत सुपे येथे असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या स्कूल बसला चारचाकी गाडीने धडक दिली आहे.यात सात वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एका विद्यार्थ्यांनी जखमी झाली आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव अवनी गणेश ढसाळ (वय.७) असे आहे.तर यामध्ये जखमी झालेल्या मूळचे नाव मरिन तांबोळी असून तिला उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे व इतर पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अशी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कुसेगाव अष्टविनायक रोडवर पडवी हद्दीत शनिवारी ( दि.१२) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.बारामती तालुक्यातील सुपे येथे असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस निघाली होती.यावेळी स्कूलबस व खासगी चारचाकी वाहनांचा समोरा समोर जोरदार धडक झाली.या धडकेत पाटस येथील एका सात वर्षीय विद्यार्थांनाच जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस समीर भालेराव व घनश्याम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांना दुखापत झाली असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.छोट्या ओमणी मारुती व्हॅनमधून हे विद्यार्थी शाळेसाठी निघाले होते.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *