बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रस्त्यावरील ताप्यातील गाड्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बारामतीत नो पार्कींग मध्ये गाडी लावल्यास पोलिसांकडून दंड केला जातो. आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यातील गाड्या एक तास उभ्या राहिल्याने भिगवण चौक ते अहिल्यादेवी चौक दरम्यान काही वेळ वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य बारामतीकरांना झाला असुन, आता बारामतीचे पोलीस भरणे यांच्या वर काय कारवाई करणार करण्यास तत्परता दाखवणार का ?
सर्वसामान्यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास बारामती पोलिसांकडून अगदी तत्परतेने गाडीला दंड मारला जातो,खटला भरला जातो.त्यामुळे आता बारामती पोलीस आता भरणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर खटला भरण्यास तेवढीच तत्परता दाखवणार का ? असा प्रश्न आता बारामतीकरांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना वेगळा न्याय ? आणि मंत्र्यांना वेगळा न्याय हे बारामतीत बारामतीकरांना अनुभवयास मिळणार का ? हे पाहणं देखील औतुक्याचं ठरणार आहे.