बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी मुगुटराव काकडे ( रा.निंबुत,ता.बारामती,जि.पुणे यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करत व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी हितसंबंधाचा वापर करून शेअर्सचे पैसे काढून घेतल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०,४६७,४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अभिजित बापूसाहेब देशमुख, वय.४३ वर्षे ( रा.कळंबवाडी,पान ता.बार्शी,जि.सोलापूर ) सध्या रा.E- ५०४,मधुवंती बिल्डिंग, नांदेडसिटी,सिंहगड रोड पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,संगीता बापूसाहेब देशमुख,ऐश्वर्या उर्फ संगीता महेंद्रसिंह जाधवराव,मनीष बापूसाहेब देशमुख ( सौ.मनीषा राजेंद्र शिंदे ),अनिता बापूसाहेब देशमुख ( सौ.अनिता प्रमोद बर्गे ) या तिघींच्या नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स होते.त्यापैकी बहीण मनीषा बापूसाहेब देशमुख, अनिता बापूसाहेब देशमुख, यांच्या नावावर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात असलेल्या शेअर्सपैकी प्रत्येकी एक एक शेअर्सचे पाच हजार रुपये असे दोन शेअर्सची दहा हजार रक्कम ही फिर्यादीची बहीण सौ.मनीषा व सौ.अनिता यांच्या बँकेच्या खाते असताना देखील,त्यांचे कोणत्याही बँकेत खाते नसल्याचे भासवून बनावट अर्ज करून रोख स्वरूपात संशयित आरोपी शहाजी मुगुटराव काकडे यांनी सोमेश्वर साखर कारखान्यातुन त्याचे कारखान्यावरील प्रशासनातील अधिका-यांशी असलेल्या हितसंबधाचा वापर करुन रोख स्वरुपात शेअर्सचे पैसे दि.१६ नोव्हेंबर २०११ रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथुन काढुन घेवुन तसेच फिर्यादीची आई कै.सुमन बापुसाहेब देशमुख हिचे मौजे निंबुत ता.बारामती जि.पुणे येथील शेतजमीन जुना गट नं.१७१ त्याचा नवीन गट नं.१६७ मध्ये ३ हेक्टर ४४ आर (साडेआठ एकर जमीन) ही दि.२३ मार्च १९९४ रोजी बारामती सब रजिस्टरी ऑफीस बारामती येथे बनावट असाईमेंट डीड करुन सदरचा दस्त क्र.९३० अन्वये हा फिर्यादीचे व फिर्यादीच्या आईचे परस्पर करण मेघराज काकडे व अमेय सुरेश काकडे दोघे सध्या रा.कोल्हापुर यांना परस्पर विक्री करुन फिर्यादीची फिर्यादीच्या कुटुंबियांची आर्थीक फसवणुक केली आहे.असे फिर्यादी देशमुख यांनो फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.